दलितांवरील अन्यायाचा काँग्रेसकडून निषेध
By admin | Published: October 29, 2015 02:09 AM2015-10-29T02:09:09+5:302015-10-29T02:09:09+5:30
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्यात असलेल्या सरकारच्या काळात दलितांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे.
गोगावात कार्यक्रम : धम्मचक्र प्रवर्तन दिन
ंंगडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्यात असलेल्या सरकारच्या काळात दलितांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. तालुक्यातील गोगाव (अडपल्ली) येथे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोमवारी आयोजित करून सरकारवर तोफ डागण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे होते. यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष केवळराम नंदेश्वर, युवक काँग्रेसचे अमर नवघरे, डोमाजी भैसारे, घनश्याम उंदीरवाडे, महिपाल उंदीरवाडे, नंदेश्वर, प्रतीक बारसिंगे, बाळगंगाधर मेश्राम, रेमाजी खेवले, भीमराव उंदीरवाडे, नामदेव खोब्रागडे, तुळशिदास रामटेके, सुलोचना उंदीरवाडे, गीता गोवर्धन, मीना रायपुरे, आकांक्षा उंदीरवाडे उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून बहुजनांना सन्मानाचा मार्ग दाखविला व बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता केली. याची जाणीव समाजाने ठेवावी, असे आवाहन रजनिकांत मोटघरे यांनी केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.