कमलापूर-पातानीलच्या हत्तींना थांबविण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी, मानवी साखळी आणि ठिय्या आंदोलनातून वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 06:09 PM2022-05-20T18:09:05+5:302022-05-20T18:09:12+5:30

Elephants News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

Congress seeks Gandhigiri, human chain and sit-in movement to stop elephants in Kamalapur-Patanil | कमलापूर-पातानीलच्या हत्तींना थांबविण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी, मानवी साखळी आणि ठिय्या आंदोलनातून वेधले लक्ष

कमलापूर-पातानीलच्या हत्तींना थांबविण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी, मानवी साखळी आणि ठिय्या आंदोलनातून वेधले लक्ष

googlenewsNext

गडचिरोली - राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून नारेबाजी करण्यात आली. तसेच एक दिवशीय धरणे देण्यात आले.
कमलापूर व पातानील येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्याचे वैभव आहे. अनेक वर्षांपासून हत्तींचे येथे वास्तव्य आहे. त्यांच्यामुळे आजपर्यंत कुठल्याही मानवास हानी झाली नाही. शिवाय या हत्तींच्या वास्तव्याने कमलापूरला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे येथील हत्तीचे स्थलांतर करून हे हत्ती जामनगर (गुजरात) येथील खासगी प्राणी संग्रहालयात नेणे ही बाब योग्य नाही. त्यामुळे कमलापूर वाचवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, विमुक्त भटक्या जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, एटापल्ली तालुकाध्यक्ष संजय चरडूके, नगरसेवक निजाम पेंदाम, मोहन नामेवार, आकाश परसा, अक्षय भोवते, हरबाजी मोरे, संजय चन्ने, वसंत राऊत, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, अंकुश गाढवे, सुधीर बांबोले, रजाक खान, किसन हिचमी, मनोहर बोरकर, अमर गाढवे, संतोष मडावी, नागाजी कोरत, रामेश्वर, देवानंद गावडे, तानाजी दुर्वा, लालसू, भुजनगराव तोडसाम, रंगा गावडे, रवी कुमरे, चरणदास गावडे, विठ्ठल तोडसाम, माधव पोटावी, लकमु गावडे, मुटयालू गावडे, सुरेखा कामसे, फुलाबाई मडावी, कमलाबाई मडावी यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते व गावकरी सहभागी झाले होते.

Web Title: Congress seeks Gandhigiri, human chain and sit-in movement to stop elephants in Kamalapur-Patanil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.