मरगळ झटकून काँग्रेस भिडली कामाला

By admin | Published: November 2, 2014 10:35 PM2014-11-02T22:35:35+5:302014-11-02T22:35:35+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने

The Congress started working hard to get away from it | मरगळ झटकून काँग्रेस भिडली कामाला

मरगळ झटकून काँग्रेस भिडली कामाला

Next

गडचिरोली/आरमोरी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने जोम धरा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
रविवारी गडचिरोली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे होते. उद्घाटक म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी रविंद्र दरेकर, प्रभाकर वासेकर, आनंदराव आकरे, अतुल मल्लेलवार, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर, धानोरा पं. स. सभापती कल्पना वड्डे, गडचिरोली पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, अमिता लोणारे, राजेश ठाकूर, राबीन शहा, अ‍ॅड. गजानन दुग्गा, सी.बी. आवळे, काशिनाथ भडके, प्रतिभा जुमनाके, सतिश विधाते, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, केदारनाथ कुंभारे, देसाईगंजचे नगरसेवक निलोफर शेख, प्रा. विठ्ठल निखुले, राकेश रत्नावार आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी शनिवारी आरमोरी येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, रविंद्र दरेकर, परसराम टिकले, जेसा मोटवानी, हिरा मोटवानी, प्रशांत मोटवानी, किशोर वनमाळी, व्यंकटी नागिलवार, मनोज अग्रवाल, शामिना उईके, चंदू वडपल्लीवार, केतू गेडाम, श्यामलाल मडावी, अमोल पवार, शहजाद शेख, शिवाजी राऊत, डॉ. मेघराज कपुर, आनंदराव आकरे, यादवपाटील गायकवाड, मंगला कोवे, आशा तुलावी, प्रभाकर तुलावी, श्याम धाईत, जयदेव मानकर, जांगधुर्वे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उसेंडी यांनी मागील १५ वर्ष पेसा कायदा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काहीही न बोलणाऱ्यांना अचानक ओबीसीचा कसा पुळका आला, असा सवाल केला तर माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धमकाविणाऱ्यांना चिरडून टाकू, असे प्रतिपादन केले. हसनअली गिलानी यांनी पक्षात राहून नेहमीच फुटीरवादी भूमिका घेणारे पक्षातून गेल्याने पक्ष आता सावकारराजमुक्त झाला, असे प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ हस्तक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे संचालन विलास ढोरे तर आभार मिलिंद खोब्रागडे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The Congress started working hard to get away from it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.