विधान परिषदेसाठी काँग्रेसची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:34 PM2018-04-08T23:34:55+5:302018-04-08T23:34:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी आणि रिपाइंची आघाडी होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमध्ये सध्या देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसामल मोटवानी यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. भाजपमधून पुन्हा स्वगृही परतलेले माजी खासदार नाना पटोले यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या नावाची फिल्डिंग वरिष्ठ स्तरावर लावली जात असल्याची चर्चा आहे.
२००६ च्या विधान परिषद निवडणुकीत मोटवानी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आपली ३० वर्षातील राजकीय कारकिर्द आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कामांमुळे पक्षश्रेष्ठी नवीन संधी देतील असा त्यांना विश्वास आहे. दुसरीकडे भाजपकडून हिंगणघाटचे व्यापारी जगदीश मियाणी हे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस-राष्टÑवादी-रिपाइंची आघाडी झाल्यास आपण पूर्ण ताकडीने लढून विजय खेचून आणू शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश झाल्यास ही निवडणूक लढण्यास तयार आहे.
-जेसामल मोटवानी,
माजी नगराध्यक्ष, देसाईगंज