काँग्रेस घेणार बूथ कमिटीची निवडणूक
By admin | Published: June 8, 2017 01:49 AM2017-06-08T01:49:15+5:302017-06-08T01:49:15+5:30
जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बुथ स्तरावर कमिटीची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.
पक्ष बळकटीकरणावर भर : जिल्हा परिषद सदस्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बुथ स्तरावर कमिटीची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून निवडणूक कार्यक्रम पाठविण्यात आला. त्याची माहिती देण्यासाठी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या जि.प.सदस्यांची बैठक बुधवारी झाली.
सदर निवडणुकीसाठी प्रत्येक बुथमधून २५ सदस्यांची नोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आली. हे सदस्य निवडणुकीसाठी मतदार म्हणून राहतील. बुथ कमिटीचे अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड ७ ते २० आॅगस्ट यादरम्यान होणार आहे. तत्पूर्वी सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे.
या बैठकीत राज्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव व इतर मागण्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठींबा दर्शवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीला जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, मनोहर पोरेटी, अॅड. राम मेश्राम, रविंद्र मेश्राम, राजू जिवाणी, श्रीनिवास दुल्लमवार, संजय चरडुके, समित्राबाई लोहंबरे, कविता भगत, रुपाली पंदीलवार, वैशाली ताटपल्लीवार, वनिता सहाकाटे, प्रमोद भगत, संजय पंदीलवार व कार्यकर्ते हजर होते.