अहेरी व कुरखेडात काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: August 7, 2015 01:19 AM2015-08-07T01:19:56+5:302015-08-07T01:19:56+5:30
केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदन सादर : शासनाच्या विरोधात दिल्या घोषणा
अहेरी/कुरखेडा : केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
अहेरी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ललीत गेट प्रकरणातील ललीत मोदी यांना मदत करण्यात केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा हात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर व्यापम घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे प्रमुख असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली होती. मात्र केंद्र शासनाने काँगे्रस विरोधात डाव रचत सुमारे २५ खासदारांना निलंबित केले, असे म्हटले आहे. केेंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शन दिले. त्यानंतर नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांच्या मार्फतीने निवेदन सादर करून २५ खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे म्हटले आहे.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेबुब अली, शीला चौधरी, प्रशांत आर्इंचवार, उषा आत्राम, अरूण बेझलवार, व्यंकटेश चिलनकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, हाजी जलीलुद्दीन काझी, ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख, अरूणा गेडाम, अविनाश भोले, गणेश चापडे, बब्बू शेख, विलास जम्पलवार, सदाशिव गर्गम, कांता कोड्रावार, भीमबाई गद्दलवार, राशिदा शेख, अक्तर बानो, अंकु दब्बा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कुरखेडा - तालुका काँग्रेसच्या वतीने स्थानिक गांधी चौकात ११ वाजता केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, पंचायत समिती सभापती शामीना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, उस्मान खॉ पठाण, गिरीधर जनबंधू, माधव दहिकर, अविनाश डोंगरे, जयंत हरडे, अमोल पवार, सुभाष नैताम, कुरखेडाचे सरपंच आशा तुलावी, गुलाब डांगे, दीपक बागडे, यशवंत गावतुरे, राहुल बागडे, गणेश सिडाम, भास्कर मडावी, धर्मेंद्र मडावी, विमला हलामी, मनोज अंबादे, ईश्वर रमकेशर, तानू सहारे, ग्रा. पं. सदस्य सिराज पठाण, बन्नू हलामी, रोहीत ढवळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरूवारी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केले, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे.