कनेरीत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

By admin | Published: June 15, 2014 11:33 PM2014-06-15T23:33:04+5:302014-06-15T23:33:04+5:30

ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यासांतर्गत कनेरी येथे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत धानावरील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आले.

Connection seed processing demonstration | कनेरीत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

कनेरीत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

Next

गडचिरोली : ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यासांतर्गत कनेरी येथे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत धानावरील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आले.
स्थानिक कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गटाने कनेरी येथे धानावरील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यात धानावरील तीन टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविक खताच्या बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिक करण्यात आले. पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच प्रक्रियेदरम्यान घेतली जाणारी खबरदारी व प्रक्रियेचे महत्व या विषयी शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी माहिती दिली. सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. एस. पी. लांबे, डॉ. एस. बी. ब्राम्हणकर, डॉ. जी. जे. भगत यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी पंकज गेडाम, आदित्य घोगरे, विवेक मडावी, संतोष वळवी, रविंद्र करंगामी यांनी करून दाखविले. प्रात्यक्षिकादरम्यान कनेरी येथील नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Connection seed processing demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.