शहीद कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:34 PM2017-12-03T22:34:59+5:302017-12-03T22:35:11+5:30
कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर रोजी शनिवारला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर रोजी शनिवारला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.
यावेळी पालकमंत्री आत्राम म्हणाले, शहीद कुटुंबियांच्या पाठीशी शासन नेहमी आहे. शहीद कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पोलीस प्रशासन व शासन शहीद कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, अशी ग्वाही नामदार आत्राम यांनी यावेळी दिली. याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते शहीद गावडे कुटुंबियांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. आत्राम यांनी शहीद कुटुंबियांना सर्व शासकीय लाभ मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश पोलीस विभागाला दिले.