गोंडगोवारींंविरोधात षड्यंत्राचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:34 AM2017-09-29T00:34:06+5:302017-09-29T00:34:16+5:30

आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यात गोंडगोवारी ही जमातच अस्तित्त्वात नाही, असा दावा केला होता.

Conspiracy efforts against Gondugawari | गोंडगोवारींंविरोधात षड्यंत्राचे प्रयत्न

गोंडगोवारींंविरोधात षड्यंत्राचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देगोवारी व गोंडगोवारी स्वतंत्र जाती : आदिवासी गोंडगोवारी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यात गोंडगोवारी ही जमातच अस्तित्त्वात नाही, असा दावा केला होता. मात्र त्यांनी केलेल्या या दाव्याचे आदिवासी गोंडगोवारी (कोपा) समाज संघटना विदर्भ शाखा पुराडा (कुंभीटोला) यांनी खंडन करीत हे षडयंत्र असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले.
प्रत्यक्षात गोवारी (एसबीसी) आणि गोंडगोवारी (एसटी) या दोन स्वतंत्र वेगवेगळ्या जाती आहेत. खºया गोंडगोवारी जमातीतील लोकांना जमातीचे प्रमाणपत्र व इतर फायदे घेण्यापासून वारंवार शासन, प्रशासनावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकून वंचित करण्याचे षड्यंत्र आहे, असे निवेदन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्यामार्फत सोमवारी पाठविण्यात आले.
सदर निवेदनानुसार, गोंडगोवारी (कोपा) जमातीचे लोक गोंड वशांतील असून गोंड राज्याचे व गोंडांची गायी चारणाºया स्थानिक लोकांनाच गोंडगोवारी (कोपा) असे म्हणतात. ही जमात प्रामुख्याने गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात वास्तव्यास आहे. यांच्या चालीरिती, बोलीभाषा, पेहराव, देवपेन, पूजापाती, रूढी-परंपरा पूर्णपणे गोंड समाजाशी एकरूप आहेत. अनुसूचित जमातीची पहिली यादी १९५० मध्ये तयार झाली. त्या यादीमध्ये अनावधानाने सुटलेल्या जमातीचे संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारने १९५३ मध्ये कालेलकर आयोगाची स्थापना केली व १० सप्टेंबर १९५६ ला पहिली संशोधित यादी प्रसिद्ध झाली. त्यात गोंडगोवारी या जमातीची नोंद आहे. या आयोगाच्या संशोधित शिफारशीनुसार खºया गोंडगोवारी जमातीला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहेत.
२४ एप्रिल १९८५ रोजी शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यात गोंडगोवारी ही जमात अस्तित्त्वात असल्याचे नमुद केले होते. दरम्यान २००६ मध्ये गोवारी विषयक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने जो अहवाल तयार केला तो योग्य आहे. परंतु नामसदृश्याचा फायदा घेणाºया लोकांमुळे खºया गोंडगोवारी जमातीच्या लोकांना, शिक्षण घेणाºया विद्यार्थी व शेतकºयांना जमातीचे प्रमाणपत्र व सवलतीसाठी शासकीय कार्यालयातून सोयी घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खºया गोंडगोवारी जमातीवर अन्याय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष गुलाब दयाराम मडावी, उपाध्यक्ष सुधाकर होळी, सचिव रघुनाथ मडावी, सोमाजी होळी, जीवनदास उसेंडी, सुखदेव नैैताम, वामन मडावी, देवाजी गावडे, सुखदेव गोटा, जुंगलू उसेंडी, लछींद्र राणा, अर्जुन उईके उपस्थित होते.

Web Title: Conspiracy efforts against Gondugawari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.