माझ्याविरूद्ध विरोधकांचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:06 PM2019-01-31T23:06:29+5:302019-01-31T23:06:47+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडबोरी येथील गोंडवाना महासंमेलनात माना समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे कपोलकल्पित विधान आपल्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभे केलेले विरोधकांचे षडयंत्र आहे. मी माना किंवा धनगर समाजाचा नेहमीच सन्मान करतो. असे असताना धादांत खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर आपण कायदेशिर कारवाई करणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडबोरी येथील गोंडवाना महासंमेलनात माना समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे कपोलकल्पित विधान आपल्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभे केलेले विरोधकांचे षडयंत्र आहे. मी माना किंवा धनगर समाजाचा नेहमीच सन्मान करतो. असे असताना धादांत खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर आपण कायदेशिर कारवाई करणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
ज्या माना समाजाच्या नवख्या उमेदवाराला आपण एबी फॉर्म देऊन आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यपदी विराजमान केले, याच माना समाजाच्या कृष्णा गजबे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे तिकीट देण्यासाठी आपण शिफारस केली, त्या माना समाजाबद्दल असे वक्तव्य आपण कसे करू शकतो? असा सवाल त्यांनी केला. वास्तविक त्या दिवशीच्या गोंडवाना संमेलनात प्रास्ताविक करणाºयाने आपल्याला उद्देशून केलेल्या भाषणात माना, धनगर समाजाचे आदिवासी आरक्षणावर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा छेडला होता. त्यावर उत्तर देताना आपण माना समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिले असल्याने मीच नाही तर सरकारसुद्धा माना समाजाचे आरक्षण नाकारू शकत नसल्याचे भाषणात सांगितले. असे असताना आपण जे बोललोच नाही ते वक्तव्य आपल्या तोंडी टाकून संन्याशाला फाशी देण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांनी करणे दुर्दैवी असल्याचे खा.नेते म्हणाले. या पत्रपरिषदेला भाजपचे पदाधिकारी सुधाकर येनगंधलवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डॉ.भरत खटी, आनंद श्रृंगारपवार, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, विलास दशमुखे आदी उपस्थित होते.