खेडेगावात संविधान महोत्सव
By admin | Published: February 8, 2016 01:34 AM2016-02-08T01:34:39+5:302016-02-08T01:34:39+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन सोमवारी करण्यात आले.
उद्देशपत्रिकेचे वाचन : समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर मार्गदर्शन
कुरखेडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन सोमवारी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच टेकमशहा सयाम होते. प्रमुख अतिथी म्हणून परसराम नाट, विश्वनाथ मेश्राम, सचिव लांजेवार, समतादूत होमराज कवडो आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कवडो यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे सामुहीक वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या मूलभूत तत्त्वांवर मार्गदर्शन केले.
विविधतेने नटलेल्या व फार मोठा विस्तार असलेल्या देशाला अखंडपणे एका धाग्यात बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताने ओळख निर्माण केली आहे. या लोकशाही अनेक संकट आले असले तरी सदर संकट पेलण्याची लिलया संविधानाने झेलली आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला खेडेगाव येथील नागरिकांसह परिसरातील नागरिकही उपस्थित होते. यशस्वीतेसाठी युवकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)