नालीचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:01+5:302021-06-30T04:24:01+5:30
सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्या नाल्या नाहीत. जमा झालेल्या सांडपाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांसमोर गटारे तयार हाेऊन ते पाणी रस्त्यावर वाहत ...
सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्या नाल्या नाहीत. जमा झालेल्या सांडपाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांसमोर गटारे तयार हाेऊन ते पाणी रस्त्यावर वाहत आहे. आश्रमशाळा ते घोट कॉर्नरपर्यंत नाल्या नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्चा नाल्यांमध्ये पाणी जमा हाेते. डासांचा त्रास होत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आश्रमशाळा ते घोट काॅर्नरपर्यंत दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चामोर्शी मुख्य हायवेपासून जाणाऱ्या बायपास रस्ता, हनुमान नगरपासून ते घोट काॅर्नर बायपास मार्गावरील राईस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, सेतू केंद्र, दुकान व्यावसायिक आहेत. खासकरून याच परिसरात सर्वांत जास्त नोकरदार वर्ग वास्तव्याने राहतात. त्यामुळे नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
===Photopath===
290621\img_20210627_113202.jpg
===Caption===
आश्रमशाळा ते घोट कॉर्नरपर्यंत नाली बांधकाम करा फोटो