घोट कॉर्नरपर्यंत नालीचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:19+5:302021-07-05T04:23:19+5:30

सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्या नाल्या नसल्याने जमा झालेल्या सांडपाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरासमोर गटार तयार झाल्याने ते पाणी रस्त्यावर वाहत ...

Construct the drain up to the Ghot Corner | घोट कॉर्नरपर्यंत नालीचे बांधकाम करा

घोट कॉर्नरपर्यंत नालीचे बांधकाम करा

Next

सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्या नाल्या नसल्याने जमा झालेल्या सांडपाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरासमोर गटार तयार झाल्याने ते पाणी रस्त्यावर वाहत आहे. आश्रमशाळा ते घोट कॉर्नरपर्यंत नाल्या नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्चा नाल्यांत पाणी जमा झाल्याने डासाचा त्रास होत असून, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आश्रमशाळा ते घोट कार्नरपर्यंत या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चामोर्शी शहरातून जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या हनुमाननगरपासून ते घोट कार्नर या बॉयपास मार्गावर राइस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी ( राजस्व ) कार्यालय, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, सेतू केंद्र, दुकान व्यावसायिक आहेत. खासकरून याच परिसरात सर्वात जास्त नाेकरदार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

040721\img_20210627_113011.jpg

आश्रम शाळा ते आष्टी कार्नर नाली गटाराचे फोटो

Web Title: Construct the drain up to the Ghot Corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.