चिचडाेह रस्ता व पुलाच्या बांधकामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:36 AM2021-04-11T04:36:12+5:302021-04-11T04:36:12+5:30
चिचडाेह रस्त्याचे खडीकरण केले हाेते. परंतु हा रस्ता संपूर्णपणे उखडला होता. सर्वसामान्य शेतकरी व जनतेला खड्डेमय मार्गाने प्रवास करावा ...
चिचडाेह रस्त्याचे खडीकरण केले हाेते. परंतु हा रस्ता संपूर्णपणे उखडला होता. सर्वसामान्य शेतकरी व जनतेला खड्डेमय मार्गाने प्रवास करावा लागत हाेता. याच रस्त्यावर चिचडोह येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला चिचडोह प्रकल्प पूर्णत्वास आल्याने येथे पर्यटक मोठी गर्दी करतात. याच रस्त्याने येथील नदीघाटावर स्मशानभूमी आहे. याच रस्त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा व लोंढोली येथे अतिशय कमी वेळेत पोहोचता येते. सदर मार्गाची दुरुस्ती व पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात हाेती. आ.डाॅ. हाेळी यांनी या मागणीची दखल घेतली व पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार आता काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी आ.डॉ, होळी यांनी केली. यावेळी अभियंता प्रमोद कुंभलवार, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.