बांधकाम विभाग वाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:14 AM2018-01-24T01:14:09+5:302018-01-24T01:15:05+5:30
कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे यांनी सोमवारी येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाला भेट दिली असता, येथे एकच कर्मचारी उपस्थित होता. अधिकाऱ्यांसह तब्बल १६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे यांनी सोमवारी येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाला भेट दिली असता, येथे एकच कर्मचारी उपस्थित होता. अधिकाऱ्यांसह तब्बल १६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. अशा स्थितीमुळे सदर कार्यालयाचा कारभार ढेपाळला असून सभापतींनी नाराजी व्यक्त केली आहे.
जि.प. बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात अभियंता, सहायक अभियंता, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर असे एकूण १७ कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, पं.स.स्तरावर झालेल्या विकासकामांच्या बैठकीत या विभागाचे अभियंता एकदाही उपस्थित झाले नाहीत. ते प्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्याला सभेला पाठवित असतात. त्यामुळे प्रत्यक्ष अभियंत्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, या उद्देशाने सभापती काटेंगे या कार्यालयात पोहोचल्या. मात्र अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तालुक्यात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून तालुक्यातील लोकांना रस्त्यांवरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाकडून दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालयाचे अभियंता मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे. याबाबीकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे.