बांधकाम अभियंते विश्रामगृहात राहून घरभाड्याची करतात उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:05+5:302021-04-27T04:37:05+5:30

सार्वजनिक बांधकाम उपविभाग देसाईगंज येथील कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत डी. डी. वालमंदरे हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून मागील ...

Construction engineers stay in the restroom and pick up the rent | बांधकाम अभियंते विश्रामगृहात राहून घरभाड्याची करतात उचल

बांधकाम अभियंते विश्रामगृहात राहून घरभाड्याची करतात उचल

Next

सार्वजनिक बांधकाम उपविभाग देसाईगंज येथील कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत डी. डी. वालमंदरे हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून मागील तीन वर्षांपासून या कार्यालयात कार्यरत आहेत. येथीलच कार्यालयात कनिष्ठ अभियंता प्रवीण नागदेवे व राहुल माळी आदी तिघांनी वास्तव्यासाठी कुठलेही घर भाड्याने घेतले नाही. मागील तीन वर्षांपासून येथील विश्रामगृहात वास्तव्यास राहून सुटीच्या दिवशी स्वत:च्या गावाकडे ये-जा करतात. शासकीय विश्रामगृह हे विशेष अतिथींसाठी राखीव ठेवण्यासाठी व संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊनच वास्तव्यासाठी देण्याचा शासकीय नियम आहे. मात्र संबंधित शाखा अभियंता कुठलीही पूर्वपरवानगी न घेता चक्क घरभाड्याची उचल करण्यासह शासकीय विश्रामगृहातच वास्तव्यास राहून गैरवापर करीत आहेत. शासनाची दिशाभूल करून घरभाड्याची उचल केल्याप्रकरणी सदर अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डिसुजा यांनी केली आहे.

बाॅक्स

इतरांना राहण्यासाठी देतात नकार

देसाईगंज येथील विश्रामगृहात थांबवण्यासाठी अथवा पत्रकार परिषद घेण्यासाठी अनेकजण रीतसर परवानगी मागतात. परंतु विश्रामगृह रिकामे नसल्याची सबब पुढे करून परवानगी दिली जात नाही. यापूर्वी या ठिकाणी वाहने पासिंग करण्याकरिता आलेले आरटीओ कार्यालय गडचिरोली येथील अधिकारी व अन्य उच्चपदस्थ अधिकारी थांबत हाेते. परंतु आता इतर व्यक्तींना थांबण्यासाठी जागा नसल्याची सबब पुढे करून अभियंते स्पष्ट नकार देतात. शासकीय विश्रामगृह वैयक्तिक वापरासाठी उपयोगात आणले जात आहे, असा आराेप हाेत आहे.

बाॅक्स

अधिकारी म्हणतात, मेंटेनन्स रूम

देसाईगंज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गवळी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, सहायक अभियंत्यांना याबाबत विचारले असता विश्रामगृहातील सदर रूम असून मेंटेनन्स रूम आहे, असे सांगितले. परंतु ते दालन आजपर्यंत मेंटेनन्ससाठी वापरलेच नाही. सदर रूम आजपर्यंत अनेकांना भाडेतत्त्वावर दिली आहे. मेंटेनन्स रूमचा वापर भाडेतत्त्वावर देण्यासाठी कसा काय केला, असा प्रश्नही उपस्थित हाेत आहे.

===Photopath===

260421\26gad_3_26042021_30.jpg

===Caption===

वैयक्तिक निवासासाठी वापरले जात असलेले विश्रामगृह.

Web Title: Construction engineers stay in the restroom and pick up the rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.