रस्ता नसलेल्या ठिकाणी माेरीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:39 AM2021-03-23T04:39:04+5:302021-03-23T04:39:04+5:30
वैरागड : वडसा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या देलनवाडी वन परिक्षेत्रातील नागरवाही बिट क्रमांक ६ मध्ये जवळपास दाेन लाख रुपये खर्च ...
वैरागड : वडसा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या देलनवाडी वन परिक्षेत्रातील नागरवाही बिट क्रमांक ६ मध्ये जवळपास दाेन लाख रुपये खर्च करून कुपाअंतर्गत रस्त्यावर माेरीचे बांधकाम करण्यात आले. पण, रस्ताच अस्तित्त्वात नसलेल्या ठिकाणी माेरीचे बांधकाम झाले आहे.
देलनवाडीअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ६ मधील नागरवाही - साेनेरांगीअंतर्गत रस्त्यावर जिल्हास्तरीय सर्वसाधारण याेजनेतून सन २०१८-१९ या वर्षात माेरी बांधकामास मंजुरी देण्यात आली. तांत्रिक मान्यता घेऊन २ लाख ९९ हजार रुपये खर्च करून मुरूम टाकून रस्त्याची दुरूस्तीची केल्याचे कागदाेपत्री दाखविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पांदण रस्त्यावर थातूरमातूर दुरूस्ती करून संपूर्ण निधी हडप करण्यात आला. या कामाची चाैकशी करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी उपवन संरक्षक वडसा यांच्याकडे केली हाेती. मात्र, याबाबत काेणतीही चाैकशी अजूनही झाली नाही.
याच पांदण रस्त्यावर पुढे एका छाेट्या नाल्यावर सिमेंट माेरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या ठिकाणी प्रत्यक्षात रस्ता अस्तित्त्वात नाही. वैरागड परिसरात अनेक रस्त्यांची कामेही नियाेजनशून्यतेने झाल्याचे दिसून येते. विकासकामात समताेलपणा येणे गरजेचे आहे.