पीएचसीचे नवीन पॅटर्नने बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:24 AM2018-03-07T01:24:11+5:302018-03-07T01:24:11+5:30
आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली जात असून या इमारतीचे बांधकाम आरोग्य विभागाच्या नवीन पॅटर्ननुसार करण्यात येत आहे.
ऑनलाईन लोकमत
अहेरी : आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली जात असून या इमारतीचे बांधकाम आरोग्य विभागाच्या नवीन पॅटर्ननुसार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधुनिक सोयीसुविधा असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच इमारत आहे.
आलापल्ली हे गाव अहेरीपासून जवळ असले तरी सदर गाव रस्त्यावर मुख्य मार्गावर आहे. त्यामुळे अहेरी एवढेच महत्त्व याही गावाला आहे. त्यामुळे या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधली जात आहे. या नवीन इमारतीत मॉड्युलर आॅपरेशन थिएटर, प्रसुतीगृह, हिरकणी कक्ष, वेटींग रूम, सभागृह, रिसेप्शन हॉल, चेजींग रूम राहणार आहे. या सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. या इमारतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुरकर, अभियंता रवी कोहळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सदर इमारतीचे काम गुणवत्ता पूर्ण व गतीने करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी दिले.