२२१ गावांमध्ये रोहयोच्या विहिरींचे बांधकाम
By admin | Published: February 29, 2016 12:52 AM2016-02-29T00:52:42+5:302016-02-29T00:52:42+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा परिषद विभागाच्या वतीने २००६ ते २०१५ या कालावधीत ...
३३ विहिरी पूर्ण : पाणी टंचाईची समस्या होणार दूर
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा परिषद विभागाच्या वतीने २००६ ते २०१५ या कालावधीत सुमारे २२१ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरी मंजूर केल्या असून त्यापैकी ३३ गावातील विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या गावांमधील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गावांची संख्या लहान आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणी टाकी उभारणे शक्य होत नाही. त्यासाठी येणारे पाणी बिल नागरिक भरू शकत नसल्याने अनेक पाण्याच्या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. लोकसंख्या कमी असल्याने सरासरी खर्च जास्त येतो. परिणामी नागरिक हातपंप किंवा विहिरीच्याच पाण्याचा वापर करीत असल्याने हातपंप व विहिरीची मागणी सर्वाधिक होते. रोहयोने २२१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी आॅक्टोबर २०१५ पर्यंत ९४ विहिरींचे बांधकाम सुरू आहे. ३३ विहिरी बांधून पूर्ण झाले आहेत. ६२ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहेत. तर १२७ विहिरी सेल्फवर मंजूर करण्यात आल्या आहेत. विहिरींच्या बांधकामामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)