सव्वा कोटी रूपये खर्चून पशु दवाखान्याचे बांधकाम

By admin | Published: June 20, 2017 12:46 AM2017-06-20T00:46:07+5:302017-06-20T00:46:07+5:30

चामोर्शी येथे पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत १ कोटी २५ लाख रूपये खर्चुन पशुचिकित्सालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे.

Construction of veterinary hospital costing rupees five crore | सव्वा कोटी रूपये खर्चून पशु दवाखान्याचे बांधकाम

सव्वा कोटी रूपये खर्चून पशु दवाखान्याचे बांधकाम

Next

आमदारांकडून पाहणी : पशुंसाठी अत्याधुनिक सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी येथे पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत १ कोटी २५ लाख रूपये खर्चुन पशुचिकित्सालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम प्रगतीपथावर आहे.
या पशुचिकित्सालयात जनावरांसाठी एक्सरे व इतर सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहेत. इमारतीच्या बांधकामाला आ. डॉ. देवराव होळी, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजू चौधरी, तपन पाल, भाजपा नगरसेवक गेडाम, गिरीधर सातपुते, पी. व्ही. पुराम, माणिक बन्नीक आदी उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पशुंची संख्या सुद्धा अधिक होती. पशुचिकित्सालयाची जुनी इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सुसज्ज इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Construction of veterinary hospital costing rupees five crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.