वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

By गेापाल लाजुरकर | Published: April 27, 2023 06:19 PM2023-04-27T18:19:24+5:302023-04-27T18:19:56+5:30

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम

Construction was done at 84 places in three years through water and soil conservation for wildlife | वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

googlenewsNext

गडचिरोली : उन्हाळ्यात जंगलातील प्राण्याांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. जंगलातच प्राण्यांना  पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गडचिरोली वनवृत्तात एकूण ८४ कामे २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ८४ विविध कामे करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांसाठी जंगलातच पाणी उपलब्ध झाले.

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस, आदी हिंस्त्र प्राण्यांसह अन्य तृणभक्षी प्राणी आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जलस्त्रोत झपाट्याने आटतात. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यापासूनच वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. विशेष म्हणजे, बहुतांश गावांना  लागूनच जंगल असल्याने  वनातील प्राणी सहज मानवी वस्तीकडे येतात. ही स्थिती टाळण्यासाठी वन विभागाने वनतळे, कृत्रिम पाणवठे, तसेच बंधारे निर्माण करून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न  केला आहे.  गेल्या तीन वर्षात सातत्याने हे प्रयत्न सुरू आहेत.

नेचर सफारी परिसरात १५ सौरपंप

गडचिरोली वनविभागातील गुरवळा निसर्ग सफारीच्या जंगल परिसरात वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी  आहेत. येथे वावरणाऱ्या प्राण्यांना उन्हाळभर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी याच परिसरात १५ सौरपंप उभारण्यात आले आहेत. ह्या सौरपंपाच्या माध्यमातून बोअरवेलचे पाणी उपसले जाते. सदर पाणी लगतच्या वन तलावात टाकले जाते. विशेष म्हणजे, अशी सोय केवळ गडचिरोली वन विभागातच केली आहे.

वन्यप्राणी गावाकडे का येतात?

उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून भरकटतातत. याचवेळी ते गावपरिसरात आल्यानंतर गावठी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवितात. त्यामुळे पुन्हा वन्यप्राणी गावाकडे धाव  घेतात. यात हरीणवर्गीय प्राणी अधिक असतात. विशेष म्हणजे, याचवेळी वन्यप्राण्यांची शिकारसुद्धा होण्याचा धोका असतो.

Web Title: Construction was done at 84 places in three years through water and soil conservation for wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.