सिरोंचात गाळे बांधकाम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:01 PM2018-03-24T23:01:23+5:302018-03-24T23:01:23+5:30
स्थानिक मुख्य मार्गावरील बाजारवाडी परिसरात सिरोंचा नगर पंचायतीची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या भिंती पाडून येथे व्यावसायिकांसाठी दुकान गाळे तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने येथील जुन्या भिंती पाडण्याचे काम सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
सिरोंचा : स्थानिक मुख्य मार्गावरील बाजारवाडी परिसरात सिरोंचा नगर पंचायतीची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या भिंती पाडून येथे व्यावसायिकांसाठी दुकान गाळे तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने येथील जुन्या भिंती पाडण्याचे काम सुरू आहे.
सद्य:स्थितीत येथील नगर पंचायत कार्यालयाच्या कारभारात नगरम मार्गावरील महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे नगर पंचायतीची जुनी इमारत निमाकी पडून होती. सदर इमारतीमध्ये स्लॅबच्या छताचे गाळे बनविण्यात येणार आहे. यासाठी भिंतीच्या तोडफोडीचे काम सुरू करण्यात आले आहे. नगर पंचायतीच्या जुनी इमारतीत व्यावसायिकांसाठी चार दुकान गाळे बांधण्यात येणार आहेत. याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे दुकान गाळे भाडेतत्वावर व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर दुकान गाळे लिलाव पध्दतीने व्यावसायिकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती न.पं.चे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी दिली.
गाळ्याच्या भाड्यातून वाढविणार उत्पन्न
सिरोंचा नगर पंचायतीच्या वतीने जुन्या इमारतीत दुकान गाळे बांधण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. चार दुकान गाळ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे दुकान गाळे व्यावसायिकांना भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. यातून नगर पंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे.