२९ हजारांचे वीज बिल बघून ग्राहक चकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:23+5:302021-03-07T04:33:23+5:30
मार्च २०२० मध्ये वीज मीटरमध्ये बिघाड असल्याची वीज वितरण कार्यालय भेंडाळा येथे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीसाठी २०० रुपयांचे ...
मार्च २०२० मध्ये वीज मीटरमध्ये बिघाड असल्याची वीज वितरण कार्यालय भेंडाळा येथे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीसाठी २०० रुपयांचे डिमांडसुद्धा भरलेले होते. वीज मीटर दुरुस्त किंवा बदलवून दिले नाही. जो पर्यंत वीज मीटरचा बिघाड दुरुस्त होत नाही, तो पर्यंत आम्ही वीज बिल भरणार नाही, असे या वीज ग्राहकांनी ठरविले. चौदा महिन्यांचे वीज बिल एकाच वेळी २९ हजार एवढे आले. जर वेळेवर वीज कर्मचाऱ्यांनी या ग्राहकाचे वीज मीटर दुरुस्त केले असते तर एवढ्या महिन्याचे वीज बिल थकीत राहिले नसते. भेंडाळा येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सदर वीज ग्राहकांचे १६ महिन्यांचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे सध्या नऊ हजार रुपये कमी करून देऊन २० हजार रुपये भरायला सांगितले, अशी माहिती दिली. वीज मीटर गडचिरोली येथील मुख्य वीज वितरण कार्यालयात टेस्टिंगसाठी पाठविणार आहे. जर का मीटरमध्ये बिघाड असेल तर यांनी भरलेल्या वीज बिलाची रक्कम यांना परत करू; पण यांना कमी करून दिलेल्या वीज बिलाचा भरणा करावाच लागेल, असे सांगितले.