ग्रामसंवाद सरपंच संघाच्या सभेत विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:40+5:302021-09-16T04:45:40+5:30
कार्यक्रमाला ग्रामसंवाद सरपंच संघाचे राज्याध्यक्ष आजिनाथ धामणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, प्रदेश सचिव विशाल लांडगे, प्रसिद्धीप्रमुख अजितसिंग राजपूत, ...
कार्यक्रमाला ग्रामसंवाद सरपंच संघाचे राज्याध्यक्ष आजिनाथ धामणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, प्रदेश सचिव विशाल लांडगे, प्रसिद्धीप्रमुख अजितसिंग राजपूत, प्रदेश सरचिटणीस नीलेश पुलगमकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, जि.प. सदस्य कविता भगत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नंदा कुळसंगे, विदर्भ अध्यक्ष दिगंबर धानोरकर, चंद्रपूर ग्रामसंवाद सरपंच संघाचे अध्यक्ष वृषभ दुपारे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, अहेरी विभागाचे अध्यक्ष उमेश मोहुर्ले, जिल्हा सरचिटणीस आका निकोडे, हिमानी वाकुडकर, राकेश खुणे, नीलकंठ निखाडे, राजेंद्र उंदीरवाडे उपस्थित होते. सभेमध्ये चर्चा केलेल्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमांचे संचालन अर्चना जनगनवार तर आभार आकाश निकोडे यांनी मानले. यशस्वितेसाठी दर्शना भोपये, मनोहर बोधनकर, बेबी बुरांडे, किरण ताटपल्लीवार, तुकाराम गेडाम, ढिवरू मेश्राम यांनी सहकार्य केले. याप्रसंगी जिल्हाभरातील ४०० ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच उपस्थित हाेते.
बाॅक्स
या विषयांवर झाली चर्चा
ग्रामसंवाद सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. प्रमुख विषयांमध्ये यामध्ये अतिक्रमण संदर्भातील कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ग्रामपंचायतीचे वीजबिल शासनाने भरावे, कोरोना विमा ५ वर्षांकरिता लागू करावा. २४३ कलम सरपंचांना लागू करावी. सरपंचांना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र मतदार संघ असावा, २,५१५चा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्यात यावा. नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्यात यावे आदींचा समावेश हाेता.