कंत्राटी वाहनचालक व सफाईगार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:58+5:302021-09-15T04:42:58+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागांतर्गत प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर कंत्राटी वाहनचालक व सफाईगाराची नियुक्ती बाहृयस्राेत संस्थेमार्फत करण्यात आली ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागांतर्गत प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर कंत्राटी वाहनचालक व सफाईगाराची नियुक्ती बाहृयस्राेत संस्थेमार्फत करण्यात आली आहे; मात्र या वाहनचालक सफाईगाराचे गेल्या १८ महिन्यांपासूनचे मानधन थकीत असल्याने हे कर्मचारी अडचणीत आले आहेत.
दरम्यान, कंत्राटी वाहनचालक व सफाईगारांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांची साेमवारला भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. त्यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आराेग्य विभागाच्या १६ नाेव्हेंबर २०१९ ते ३० जून २०२० या कालावधीत मानवसेवा बहूद्देशीय बेराेजगार सहकारी संस्था नागपूर यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतर २ जुलै २०२० ते आजतागायत नाशिकच्या रयत स्वयंराेजगार सेवा सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आले असून, या संस्थेमार्फत कंत्राटी स्वरूपात मानधन तत्त्वावर वाहनचालक व सफाईगारांची नियुक्ती करण्यात आली. काेराेनाच्या काळात तसेच आजतागायत आम्ही प्रामाणिकपणे मुख्यालयी राहून रुग्णसेवा करीत आहाेत; मात्र आम्हाला वेळेवर मानधन मिळत नसल्या कारणाने आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, असे संघटना व कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना फिरोज खा पठाण, राहुल सहारे व इतर कर्मचारी हजर हाेते.
कर्मचाऱ्यांची पिळवणूक लक्षात घेऊन बाह्यस्राेत संस्थेद्वारा नियुक्ती न देता आराेग्य विभाग जि.प.मार्फत किंवा एनआरएचएममध्ये कंत्राटी पद्धतीने थेट नियुक्ती देण्यात यावी, तसेच मासिक मानधन वेळेत अदा करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
बाॅक्स...
मानधनात फरक
- कंत्राटी वाहनचालकांचे मासिक मानधन १९ हजार ६६४ रुपये इतके आहे, तसेच सफाईगारांचे मासिक मानधन १५ हजार ४९३ रुपये आहे; मात्र वाहनचालकास १० हजार ७०० रुपये तर सफाईगारांना ८ हजार ५९५ रुपये मानधन संस्थेमार्फत दिले जात आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक हाेत आहे.