नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:32 AM2017-08-10T01:32:05+5:302017-08-10T01:32:58+5:30
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचारी ठिय्या आंदोलन करीत बसले आहेत.
जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाºयांना नियुक्ती संदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणेच सेतू समितीमार्फत देण्याची पध्दत सुरू ठेवावी, नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांना मिळत असलेले एकत्रीत मानधन कायम ठेवावे, १ जुलै २०१६ ते आजपर्यंतचे आठ टक्के वाढीव रोखीव वेतन तत्काळ अदा करावे, समान धोरण राबविण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, डिसेंबर २०१६ ते जुलै २०१७ पर्यंतचे थकीत मानधन तत्काळ अदा करावे, तसेच वार्षिक १५ अर्जित रजा मंजूर कराव्या आदी मागण्यासाठी नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात भास्कर राऊत, विनोद नाकतोडे, ऋषी निकोडे, विजय भेडके, मेघराज डोकरमारे, व्यंकटी कावरे, मनमोहीम कोसनकर, विश्वबोधी कराडे, श्रीकांत सिडाम, नेताजी राऊत, दत्तात्रय गुरनुले, राजू पत्रे, वैशाली साळवे, सुभाष सोनवाणे, असफाख सय्यद, रूपेश बल्लारपुरे, रवींद्र राऊत, नंदकिशोर निंबेकार, देवानंद जनबंधू, प्रदीप मेश्राम, जयप्रकाश सोरते, गुणवंत भोयर यांच्यासह सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.