राष्ट्राच्या प्रगतीत हमाल-कामगारांचे योगदान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:16+5:302021-07-10T04:25:16+5:30
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा यांच्यावतीने बुधवारी संस्थेच्या प्रांगणात जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून हमाल-कामगार बांधवांचा सत्कार व ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा यांच्यावतीने बुधवारी संस्थेच्या प्रांगणात जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून हमाल-कामगार बांधवांचा सत्कार व चर्चासत्र कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आविम गडचिरोलीचे व्यवस्थापक गजानन कोटलवार, तहसीलदार सोमनाथ माळी, आविका कुरखेडाचे अध्यक्ष बाबूराव तुलावी, उपाध्यक्ष चांगदेव फाये, उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, घाटीचे आविका सभापती मुखरू टेकाम, देऊळगावचे सभापती मडावी, आविका संचालक व्यंकटी नागीलवार, नानाजी वालदे, शालिक मेश्राम, चिंतामन जुमनाके, विठ्ठल खानोरकर, रवींद्र नरोटे, अंताराम गावळे, काशीनाथ पुळो आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आविका धान खरेदी केंद्रात हमाली करणारे कामगार तसेच कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये, संचालन प्रा. विनोद नागपूरकर तर आभार लीलाधर घोसेकर यांनी मानले.
080721\0531img-20210707-wa0133.jpg~080721\0531img-20210707-wa0132.jpg
मार्गदर्शन करताना भरत दुधनाग~हमाल कामगार यांचा सत्कार करताना भरत दुधनाग तहसिलदार सोमनाथ माळी व अन्य