लष्कर अळी वेळीच नियंत्रित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:16 AM2018-08-27T00:16:36+5:302018-08-27T00:19:20+5:30

कोरची तालुक्यातील कोटगूल गावासह परिसरात धान पिकांवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या लष्कर अळीचे वेळीच व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली विषय विशेषज्ज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर यांनी केले.

Control military locks at the same time | लष्कर अळी वेळीच नियंत्रित करा

लष्कर अळी वेळीच नियंत्रित करा

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचे आवाहन : कोटगूलच्या शेतात केली पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यातील कोटगूल गावासह परिसरात धान पिकांवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या लष्कर अळीचे वेळीच व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली विषय विशेषज्ज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर यांनी केले.
तालुक्यातील कोटगूल येथील कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ज्ञ व कृषी अधिकाºयांनी थेट शेतावर भेट देऊन धान पिकांची पाहणी केली. दरम्यान बोथीकर यांनी लष्कर अळीचा जीवनक्रम शेतकºयांना समजावून सांगितला. अंडी, अळी, कोष व पतंग अळीच्या आदी अवस्थांबाबत माहिती दिली. पतंगाच्या टेकळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत करावा. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, जेणेकरून अळींना लपण्यास जागा मिळणार नाही. अळीचा प्रादुर्भाव दिसताच अळ्या जमा करून नष्ट कराव्या, बांधीत पाणी भरावे, त्यामुळे अळ्यात पाण्यात डुबून मृत्यूमुखी पडतील, असे विषयतज्ज्ञांनी सांगितले.
पिकावरून दोर अथवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्कर अळ्या पाडाव्यात, बेडकांचे संवर्धन करावे कारण बेडूक अळ्या खातात. सभोवतालच्या बांधावर किटकनाशकांची फवारणी करावी, रासायनिक किटकनाशकाची फवारणी प्रामुख्याने सकाळी अथवा सायंकाळच्या सुमारच्या वेळात केल्यास ती अधिक प्रभावी ठरते, असे बोथीकर यांनी सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. डोहणे, तालुका कृषी अधिकारी कटरे, कृषी पर्यवेक्षक आर. जे. मुळे, कृषी सहायक एस. एस. गावड, जनबंधू, जांभुळकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिकाºयांनी पिकांवरील अळींचे निरीक्षण केले.

Web Title: Control military locks at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.