गराेदर महिलांना काेराेना प्रतिबंधक लस देण्याबाबत मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:01+5:302021-07-07T04:45:01+5:30
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस गराेदर मातांना देण्याबाबत राज्य व देशपातळीवरील मंत्रालयात मंथन सुरू आहे. गराेदर मातांना काेराेना प्रतिबंधात्मक ...
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस गराेदर मातांना देण्याबाबत राज्य व देशपातळीवरील मंत्रालयात मंथन सुरू आहे. गराेदर मातांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत शासनस्तरावरून अद्यापही काेणत्याही ठाेस सूचना व मार्गदर्शन जिल्ह्यातील प्रशासन, आराेग्य विभागाचे अधिकारी व वैद्यकीय क्षेत्राला मिळाले नाही.
प्रसूत मातेला काेविड प्रतिबंधात्मक लस दिली जात असून अनेकांनी ही लस घेतली आहे. त्याचे काेणतेही दुष्परिणाम अजून आढळून आले नाहीत. आता गराेदर महिलांचे काेविड लसीकरण करण्याबाबतची तयारी शासन व प्रशासन करत आहे. त्याअनुषंगाने अभ्यास सुरू आहे.
बाॅक्स...
अद्यापही स्पष्ट सूचना नाही : डाॅ. वैशाली चलाख
- गर्भवती महिलांना काेराेना प्रतिबंधात्मक लस द्यावी की देऊ नये, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आराेग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना अजूनही मिळाल्या नाहीत. गर्भवती मातांना काेराेनाची लस दिल्यावर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत की नाही, हेही अजून सिद्ध झाले नाही, अशी माहिती गडचिराेली येथील प्रसूती व स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वैशाली चलाख यांनी दिली.
- गराेदरपणातील सुरुवातीच्या तीन महिन्यांत काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणे धाेक्याचे हाेऊ शकते. गराेदरपणाबाबत सुरुवातीला माहीत नसलेल्या महिलांनी लस घेतल्यावर गर्भपात झाला.
काेट...
गर्भवती महिलांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत मंगळवारी संपूर्ण देशभरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण हाेणार आहे. काेराेना लसीकरणाबाबत गर्भवती महिलांसंदर्भात आपण काय करू शकताे, याबाबत सूचना केंद्रीय आराेग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केल्या आहेत.
- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी, गडचिराेली.