बोनससाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:00 AM2017-09-27T00:00:53+5:302017-09-27T00:01:05+5:30

तेंदूपत्ता संकलनाचा बोनस देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी कोरची तालुक्यातील ग्रामसभांनी कुरखेडा मार्गावर मंगळवारी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले.

Convert to Bonus | बोनससाठी चक्काजाम

बोनससाठी चक्काजाम

Next
ठळक मुद्देतहसीलदारांसोबत चर्चा : कोरची-कुरखेडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तेंदूपत्ता संकलनाचा बोनस देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी कोरची तालुक्यातील ग्रामसभांनी कुरखेडा मार्गावर मंगळवारी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी व वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कोरची तालुक्यातील दवंडी, कुमकोटा, पांढरा पाणी, राजाटोला, बेलगाव, टेंभली, आंबेखारी या गावातील नागरिकांना तेंदूपत्ता संकलनाचा बोनस अजूनपर्यंत मिळाला नाही. एकूण मजुरीच्या जवळपास ५० टक्के रक्कम किंवा भागात मजुरीएवढीच रक्कम बोनस म्हणून दिल्या जाते. प्रत्येक कुटुंबाला १० ते १५ हजार रूपये रक्कम मिळते. मात्र तेंदूपत्ता संकलन होऊन आता चार महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अजूनपर्यंत बोनसचे वितरण करण्यात आले नाही. याबाबत गावातील नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. तरीही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ग्रामसभांनी एकत्र येत मंगळवारी कुरखेडा मार्गावर सकाळी ११ वाजेपासून चक्काजाम आंदोलन केले. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. कोरचीचे तहसीलदार नारनवरे, वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गडवे, संवर्ग विकास अधिकारी बी.एम. वैरागडे यांनी आंदोलनस्थळ गाठून गावकºयांसोबत चर्चा केली. बोनस दिला जाईल, असे पत्र आंदोलकांना दाखविले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनाचे नेतृत्व सीयाराम हलामी, अशोक गावतुरे, शीतल नैताम, सदाराम नरोटी, हिरा राऊत, सुदाराम सहारे, मनोहर होळी, संजय साखरे, निजामसाय काटेंगे, रामलाल नरोटी, राणेश कोरचा, भारत नरोटे, झाडूराम सलामे, मंसराम नरूटी, धनीराम हिडामी, वासुदेव हिडामी, रामू होळी यांच्यासह दवंडी, कुमकोट, पांढरा पाणी, राजाटोला, बेलगाव, टेमली, आंबेखारी या गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Web Title: Convert to Bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.