कुरखेडा व अहेरी काेविड सेंटरचे रुग्णालयात रूपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:36 AM2021-05-13T04:36:40+5:302021-05-13T04:36:40+5:30
या अनुषंगाने राकाँचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य रवींद्र वासेकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आराेग्यमंत्री, पालकमंत्री, आ. धर्मरावबाबा आत्राम ...
या अनुषंगाने राकाँचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य रवींद्र वासेकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आराेग्यमंत्री, पालकमंत्री, आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली जिल्हा अतिसंवेदनशील असून, भाैगाेलिकदृष्ट्या ४५० किमीचा आहे. दक्षिणेकडे गडचिराेली-सिराेंचा (पातागुड्डम) हे अंतर २५० किमी व उत्तरेकडे गडचिराेली ते काेरची (मसेली बेतकाठी) हे अंतर २२५ किमी आहे. गडचिराेली स्थित दाेनच काेविड रुग्णालये आहेत. उर्वरित सर्व तालुक्यांत काेविड केअर सेंटर आहेत. काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अंतर अधिक पडत असल्याने गंभीर रुग्णांवर वेळीच औषधाेपचार करता येत नाही. त्यामुळे आवश्यक ती उपाययाेजना आवश्यक आहे, असे वासेकर यांनी म्हटले आहे.
बाॅक्स ......
निवेदनातील मागण्या
गडचिराेली जिल्ह्यात काेराेना चाचण्या वाढविण्यात याव्यात, कुरखेडा व अहेरी उपजिल्हा रुग्णालयात काेविड रुग्णालय सुरू करून तेथे सीटी स्कॅन, ऑक्सिजन, रुग्णवाहिका आदी सुविधा कराव्यात. प्रत्येक काेविड सेंटरमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करावी. गडचिराेली शहरात स्वर्गरथ व इलेक्ट्रिक शवदायिनीची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.