सहकार चळवळ व्यापक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:42 AM2018-04-04T01:42:08+5:302018-04-04T01:42:08+5:30
बिना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे सहकाराशिवाय विकास नाही. सहकार क्षेत्राचे जिल्हा विकासात योगदान मिळाले पाहिजे, यासाठी सहकार कायद्यातील तरतुदीचे व बारकाव्याची माहिती महिलांनी जाणून घेतली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बिना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे सहकाराशिवाय विकास नाही. सहकार क्षेत्राचे जिल्हा विकासात योगदान मिळाले पाहिजे, यासाठी सहकार कायद्यातील तरतुदीचे व बारकाव्याची माहिती महिलांनी जाणून घेतली पाहिजे. सहकार क्षेत्रातील सभासद महिलांनी स्वत:ला अद्यावत ठेवून जिल्ह्यात सहकार चळवळ व्यापक करावी, असे आवाहन जिल्हा सहकारी बोर्ड लि.गडचिरोलीचे सहकार विकास अधिकारी पी. व्ही. तलमले यांनी केले.
महाराष्टÑ राज्य सहकारी संघ मर्या. पुणेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राधाकृष्ण महिला नागरी सहकारी पतसंस्था व जिल्हा सहकारी बोर्ड व सहकार विभागाच्या वतीने गडचिरोली येथे सदर संस्थेच्या कार्यालयात सोमवारी सहकार प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीकृष्ण अर्जुनकर, राधाकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी अर्जुनकर, सचिव कमल आनंदराव सातपैसे उपस्थित होते.
कार्यक्रमाला संस्थेच्या सदस्य सुनीता भांडेकर, प्रतिभा कुंभारे, किर्ती बुरांडे, रत्नमाला येवले, योगिता चुधरी, शुभांगी बोरकुटे, अश्विनी बाबनवाडे, भारती ठाकरे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे लेखापाल पीतांबर बोरकुटे, अरविंद मुनघाटे, मीनल विरवार यांनी सहकार्य केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात तलमले व अर्जुनकर यांनी पतसंस्थेचे काम सहकारी विभागाच्या नियमानुसार कसे केल्या जाते, सहकार कायद्याचे ज्ञान, सरकारच्या विविध कर प्रणालीची माहिती आदींबाबत महिला सभासदांना विस्तृत मार्गदर्शन केले.