गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:36 AM2017-11-30T00:36:50+5:302017-11-30T00:37:08+5:30

गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

Coordination is necessary for village development | गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : ठाणेगाव येथे ग्रामसभा; मुख्य कार्यकारी अधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, पंचायत समिती सभापती बेबीताई उसेंडी, जि.प. सदस्य खोब्रागडे, पं.स. सदस्य निता ढोरे, उपसरपंच कुकुडकर, आनंद बादवे, गोपाळ भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर, स्वप्नील वरघंटे, अरूण वघाडे, सदानंद कुथे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना गाव पेसा अंतर्गत आल्याने पाच टक्के निधी विकासाकरिता मिळत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या मार्फतीने दिला जाणार आहे. मागेल त्याला शेततळे, विविध शौचालय आदी योजना सुध्दा राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदान व निधीचा गावाच्या योग्य विकासासाठी प्रयत्न करून आदर्श व विकसीत गाव निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.

Web Title: Coordination is necessary for village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.