कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला लागला ब्रेक, घराघरांत चारचाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:38 AM2021-07-28T04:38:10+5:302021-07-28T04:38:10+5:30

(कोट) प्रवासी जीप-ऑटोचालक परेशान गेल्या दीड वर्षापासून गाडी बंदच आहे. काही दिवस सुरू होती; पण जास्त प्रवासी भरू देत ...

Corona caused a break in passenger transport, four-wheelers in homes! | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला लागला ब्रेक, घराघरांत चारचाकी!

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला लागला ब्रेक, घराघरांत चारचाकी!

googlenewsNext

(कोट)

प्रवासी जीप-ऑटोचालक परेशान

गेल्या दीड वर्षापासून गाडी बंदच आहे. काही दिवस सुरू होती; पण जास्त प्रवासी भरू देत नव्हते, म्हणून परवडत नव्हते. आता दुसरा काही व्यवसाय करण्याचा विचार आहे.

-प्रणय दुर्गे, काळीपिवळी चालक

----

ऑटोवरच कुटुंब जगवत होतो; पण सतत लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात ऑटोमुळे लोकांची सोय होत होती; पण आता लोकांनी प्रवास करणेच सोडल्याचे दिसते. कोणीही चारचाकी नाही, तर दुचाकीने जातात.

-प्रवीण गेडाम, ऑटोचालक

(कोट)

म्हणून घेतली चारचाकी

- आम्हाला कार घ्यायचीच होती; पण एवढ्या लवकर घेणार नव्हतो. कोरोनामुळे बस किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास करणे रिस्की झाले. त्यामुळे लवकर कार घेण्याचा निर्णय घेतला. आता कारनेच प्रवास करतो.

-अरुणा सुने

---

- कार घेण्याचे सर्व श्रेय कोरोनालाच जाते. सेकंड हँड का असेना, कार घेतली ती केवळ कोरोनामुळे. नाहीतर अजून दोन-तीन वर्षे कार घेण्याचा विचारही नव्हता. एसटीने जाणे धोक्याचेच वाटते.

-सुरेंद्र चचाने

Web Title: Corona caused a break in passenger transport, four-wheelers in homes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.