आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:49 AM2020-05-18T09:49:13+5:302020-05-18T09:50:24+5:30

मुंबई-पुण्याकडून गडचिरोली जिल्हयात आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक विलगिकरणात ठेवलेल्या तीन जणांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

corona in Gadchiroli, which has been a green zone till now | आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव

आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव

googlenewsNext
ठळक मुद्दे3 जणांचे नमुने पॉझिटिव्हतीनही व्यक्ती जिल्हयाबाहेरून आलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंबई-पुण्याकडून गडचिरोली जिल्हयात आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक विलगिकरणात ठेवलेल्या तीन जणांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला आणि आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ निर्माण झाली.
या तीन रुग्णांपैकी दोघे जण कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाईन सेंटरमध्ये तर एक चामोर्शीमधील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये होता. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाचे तपशील घेणे सुरू आहे.
सदर पॉझिटीव्ह व्यक्तींचा 16 मे रोजी जिल्हयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते.
जिल्हयातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या प्रवाशांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

Web Title: corona in Gadchiroli, which has been a green zone till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.