कोरोना लॉकडाऊनमुळे तांदळाची निर्यातही झाली ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:02+5:302021-05-13T04:37:02+5:30
तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजारपेठेत सध्या श्रीराम धानाला प्रति ...
तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजारपेठेत सध्या श्रीराम धानाला प्रति क्विंटल २ हजार ७०० रुपये ते २ हजार ७५० रुपये भाव आहे, तसेच जयप्रकाश धानाला २ हजार ९५०, मोहरा ३ हजार १०० रुपये भाव आहे. तालुक्यातील उत्तम प्रतीच्या तांदळाला बिहार, छत्तीसगड राज्यात खूप मागणी आहे. शहरात ७ राईस मिल असून, त्यापैकी ४ बंद आहेत. सध्या तीन राईस मिल सुरू आहेत. सध्या कोरोना महामारी संकट असल्याने तांदूळ विक्री व्यवसाय ठप्प पडला आहे. तांदूळ भरडाई कामासाठी असलेल्या मजुरांचा राहण्याचा खर्च मिल मालकाकडून उचलला जात आहे. शहरातील राईस मिलमधून तयार झालेला तांदूळ बिहार, छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी नेला जात असतो. परराज्यात या तांदळाला खूप मागणी आहे.
गतवर्षीसुद्धा कोरोना संकटामुळे तांदूळ व्यवसाय ठप्प पडला होता. परत दुसऱ्याही वर्षी या व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देत एक पाळीत मजुरांकडून काम केले जात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन तीन वर्षांपासून काळ्या धानाची लागवड केली जात आहे. हे तांदूळ आरोग्यास उपयुक्त असल्याने शेतकरी काळ्या धानाचे पीक घेत आहेत. धान भरडाई झाल्यावर तांदळाच्या पिशव्या तयार करण्यात येत असतात. यात २५ किलो, ३० किलो वजनाच्या व १० किलो वजन असलेल्या पिशव्या तयार करून पॅकिंग केले जातात. यात मुख्यत्वे श्रीराम, जयश्रीराम या तांदळाला बाजारपेठेत अधिक मागणी आहे.
बॉक्स याबाबत शहर राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दोषी यांना विचारणा केली असता
बारीक पोत असलेल्या तांदळाला परराज्यात खूप मागणी आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते; मात्र गेल्या वर्षीपासून तांदूळ विक्री व्यवसाय असलेल्या महिन्यात कोरोना महामारी संकट येत असल्याने या व्यवसायाला फार मोठा फटका बसला आहे, तसेच या व्यवसायातून मजुरांना चार पैसे पदरी पडत होते त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता; मात्र तांदूळ विक्री ठप्प असल्याने तांदूळ भरडाई काम केवळ ५० टक्क्यांवर आले आहे. लॉकडाऊनमुळे तांदूळ विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे.
चंद्रकांत दोषी, अध्यक्ष, शहर राईस मिल असोसिएशन चामोर्शी.
===Photopath===
120521\img-20210512-wa0122.jpg
===Caption===
चामोर्शी येथील उच्च प्रतीच्या तांदळाला बाहेर राज्यात मागणी कोरोना लागल्यामुळे तांदूळ व्यवसाय ' लॉक '