गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:30 PM2020-07-10T12:30:52+5:302020-07-10T12:32:34+5:30
मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले. यादरम्यान अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला. कार्यालयीन बैठकांनाही ते हजर होते. त्यामुळे अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला असून त्या लोकांचा शोध घेणे सुरू केले आहे.
मुलचेराचे तहसीलदार, प्रभारी पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह 19 जणांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. आज अधिकारी वगार्ची रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यांना गृह विलगीकरण ठेवणार असल्याची माहिती आहे.उर्वरित कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
मुख्याधिकारी साबळे हे 23 जूनला औरंगाबादवरून मुलचेरा येथे आले. येथे आल्यानंतर त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक होते. मात्र कार्यालयीन जबाबदाऱ्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची कल्पना असून आपण योग्य ती खबरदारी घेऊनच लोकांच्या संपर्कात आल्याचे साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. येथील विलगीकरण कक्षाच्या झोनल ऑफीसरची जबाबदारीसुद्धा तहसीलदारांनी साबळे यांच्याकडे सोपवलेली आहे. साबळे हे मुलचेरा येथे आल्याबरोबर नगरपंचायतीच्या स्थायी समितीची सभा घेतली ज्यात नगराध्यक्षांसह पाच सभापती उपस्थित होते. यासोबतच जमीनवादाची सुनावणी मुख्याधिकारी यांनी घेतली. तिथेसुद्धा त्यांचा अनेकांसोबत संबध आल्याची चर्चा आहे. त्यांच्या संपकार्मुळे मुलचेरा, विवेकानंदपूर गावात भीतीचे वातावरण पसरले असून ही दोन्ही गावे कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.