लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:27 PM2020-04-19T23:27:26+5:302020-04-19T23:28:21+5:30
कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेके लघू व्यवसायिक संकटात सापडले आहेत. विशेषत: उन्हाळ्यात लग्न सोहळे व इतर मुहूर्तावर अवलंबून असणारे कारागीर आणि कामगार हवालदिल झाले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असतात. मात्र, यावर्षी बरेच सोहळे लांबणीवर पडले किंवा रद्द झाले. त्यामुळे विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.
कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.
सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊ उन असल्याने व्यवसाय व उद्योगांना टाळे लागले आहे. मंगल कार्यालय एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटात गजबजून जाते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयामध्ये कमालीचा सन्नाटा दिसून येत आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहे. या हंगामात वधू- वरांपासून ते वºहाडी मंडळीसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. अहेर म्हणून साड्या व इतर वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने कापड दुकानावर व रेडीमेड कपडे विक्रेते हतबल झाल्याचे कापडे व्यापारी सांगत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व लग्न सोहळ्याच्या तारखा रद्द करण्यात आले. जूनपर्यंत सभागृहामध्ये कोणतेही सोहळे होणार नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तर छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आल्याचे छायाचित्रकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ऐन हंगामात डेकोरेशन व्यावसायिक अडचणीत
मंडळ डेकोरेशनचा व्यवसायकही अडचणीत सापडला आहे. यंदा जून महिन्यापर्यंत लग्नतिथी होत्या. मात्र ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना अवतरला. देशात लॉकडाऊ न करावे लागले. सर्वच धार्मिक कार्यक्रम लग्नसोहळे व इतर कार्यक्रम रद्द झाले आहे. आता काम नसल्याने मजुरांसह मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच पडून
उन्हाळ्यातील लग्न सोहळा लक्षात घेवून शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड करतात. यावर्षीही अनेक शेतकºयांनी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे रबी हंगामात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनामुळे वाहतुकीस बंदी असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतातून भाजीपाला शहरात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतकरीसुध्दा त्रस्त आहे. कोरोनाचाही त्यांना आर्थिक फटका बसला आहे.