कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:26+5:302021-06-09T04:45:26+5:30
डबक्यांमध्ये गप्पी मासे १) डासांच्या अंडीतून आधी अळी बाहेर पडते. त्या अळीचा डास तयार होतो. ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामध्ये तयार ...
डबक्यांमध्ये गप्पी मासे
१) डासांच्या अंडीतून आधी अळी बाहेर पडते. त्या अळीचा डास तयार होतो. ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामध्ये तयार होणाऱ्या डासांच्या अळ्या खाण्यासाठी गप्पी मासे सोडली जातात.
२) जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात ४५५ गप्पी मासे पैदास केंद्र आहेत. तेथून आरोग्य कर्मचारी मासे घेऊन गावोगावाच्या डास उत्पादक ठिकाणी सोडतात.
...ही घ्या काळजी
- डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याचे डबके साचणार नाही, याची दक्षता घ्या. नेहमी साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगून गप्पी मासे सोडा.
- संध्याकाळच्या वेळी घराची दारे-खिडक्या बंद ठेवा. रात्रीच्या वेळी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. यामुळे डासांचा दंश होणार नाही आणि डासजन्य आजार होणार नाहीत.
- डासनाशकाची फवारणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. घरात सर्वत्र फवारणी करून घ्या. नाली किंवा डबक्यात अधूनमधून रॉकेलसारखे तेलजन्य पदार्थ टाका.
(कोट)
जंगलामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते; पण लोक त्यांचा योग्य वापर करत नाहीत. तो केल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
-डॉ. कुणाल मोडक,
जिल्हा हिवताप अधिकारी