कोरोनाबळींनी गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:32+5:30
जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८८७२ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८५०० वर पोहचली आहे. सध्या २७२ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के आहे. क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण ३.०७ टक्के तर मृत्यू दर १.१३ टक्के झाला आहे.
नवीन १६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, कुरखेडा १ यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४० रूग्णांमध्ये गडचिरोली १६, अहेरी ९, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा २, सिरोंचा १, कोरची १, कुरखेडा ३ आणि देसाईगंजमधील एका जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील विसापूर २, आयटीडीपी कॉलनी १, प्रकल्प कार्यालय १, देवापूर १, चामोर्शी रोड २, कन्नमवार वार्ड २, कॅम्प एरिया १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एलबीपी शाळेजवळ हेमलकसा १, चामोर्शी तालुक्यातील धर्मापूर १, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा १, आणि इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये एका जणाचा समावेश आहे.
सिराेंचा व काेरचीत प्रत्येकी केवळ एक रूग्ण
काेराेना रूग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून घटत चालली आहे. एकूण रूग्णांच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यात सरासरी तीन टक्के रूग्ण ॲक्टीव्ह असल्याचे दिसून येते. काेरची, सिराेंचा या तालुक्यांमध्ये केवळ एक रूग्ण शिल्लक आहे. मुलचेरा तालुक्यात तीन रूग्ण आहेत. एटापल्ली तालुक्यात केवळ १० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.