थंडीची चाहुल लागताच वाढले कोरोनारूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:00 AM2020-11-05T05:00:00+5:302020-11-05T05:00:16+5:30
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १४.६८ टक्के आणि मृत्यूदर ०.९६ टक्के झाला आहे.
n लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या तीन-चार दिवसांत तापमान घसरल्याने बोचरी थंडी वाढत आहे. त्यासोबतच कोरोनारुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी १२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या ९१५ वर पोहोचली आहे. याचवेळी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १४.६८ टक्के आणि मृत्यूदर ०.९६ टक्के झाला आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील एएनएम होस्टेलमधील १, रेड्डी गोडावूनजवळील १, साईनगर १, आयोध्यानगर १, बाजवडी १, कॅम्प एरिया ४, चामोर्शी रोड ३, चनकाई नगर १, सीआरपीएफ ३, गुरूकुंज कॉलनी १, कन्नमवार वार्ड १, नवेगाव १०, ताडगाव १, आशीर्वाद नगर १, बसेरा कॉलनी १, बोदली १, कारमेल शाळेजवळ ३, शहर इतर ३, गांधी वार्ड २, गणेशनगर १, गोगाव १, इंदिरानगर १, आटीआय चौक १, कन्नमवार वार्ड १, कोटगल ३, मुरमाडी १, रामपुरी ४, पोर्ला २, रामनगर १, रेव्हेन्यू कॉलनी १, शिवाजी नगर २ व इतर जिल्हयातील २ यांचा समावेश आहे. अहेरीमध्ये आलापल्ली २, राजवाडाजवळ २ व इतर स्थानिक आहेत. आरमोरीमधील किटाळी व वैरागड मधील प्रत्येकी एक आणि इतर सर्व स्थानिक आहेत. भामरागडचे सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी इल्लूर, अनकोडा व घोट मधील प्रत्येकी एक आहे. धानोरा सीआरपीएफ १, शहर १, लेखा १ व झाडापापडा १ जणाचा समावेश आहे. कोरचीमधील गहाणेगट्टा १ व इतर स्थानिक आहेत. कुरखेडा पळसगड ८ जण, मुलचेरा तालुक्यात लगाम व गोविंदपूर येथील एक आहे. सिरोंचा चिक्या रेगुंठा १, पोलीस स्टेशन सिरोंचा १ जण तसेच वडसामधील शिवाजी वार्ड १, चोप १, कुरड १ व स्थानिक होमगार्ड १ जण आहे.
असे आहेत नव्याने बाधित व कोरोनामुक्त रुग्ण
नवीन १२२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६१, अहेरी १३, आरमोरी १०, भामरागड ६, चामोर्शी ३, धानोरा ५, एटापल्ली १, कोरची ४, कुरखेडा १०, मुलचेरा २, सिरोंचा ३ आणि देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.
बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या ५६ रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३२, अहेरी ५, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी ४, धानोरा ६, एटापल्ली ९१, मुलचेरा १, कोरची १ व कुरखेडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.