कोरोनाचा मृत्यूदर एक टक्यापेक्षाही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:08+5:30
कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४०, वडसा १५, आरमोरी ४, एटापल्ली ३, अहेरी ५, चामोर्शी ६, धानोरा २, कोरची ६, भामरागड ५, मुलचेरा १, सिरोंचा ६ व कुरखेडा येथील ६ जणांचा समावेश आहे. नवीन १११ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, अहेरी २६, आरमोरी १०, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा ४, एटापल्ली १५, कोरची ७, कुरखेडा २, सिरोंचा ३ व वडसा येथील ६ जणांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासात सक्रिय रूग्णांपैकी ९९ जण कोरोनामुक्त झाले तर १११ जणांची नव्याने कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा सक्रिय आकडा ८४४ झाला. आत्तापर्यंत एकुण बाधित ३ हजार १९७ कोरोना बाधितांपैकी २हजार ३३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ०.६६ टक्के एवढे आहे.
कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४०, वडसा १५, आरमोरी ४, एटापल्ली ३, अहेरी ५, चामोर्शी ६, धानोरा २, कोरची ६, भामरागड ५, मुलचेरा १, सिरोंचा ६ व कुरखेडा येथील ६ जणांचा समावेश आहे.
नवीन १११ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, अहेरी २६, आरमोरी १०, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा ४, एटापल्ली १५, कोरची ७, कुरखेडा २, सिरोंचा ३ व वडसा येथील ६ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५ जण आढळून आले. यात रामनगर १, इतर जिल्हयातील १, कॅम्प एरिया १, आयटीआय चौकाजवळ १, गोकुळ नगर ३, डॉ.मलीक दवाखान्याजवळ १, झासी रानीनगर १, लांझेडा १, आरोग्य वसाहत १, नवेगाव परिसर ७, पोर्ला, पीडब्यू कॉलनी १, रामनगर ३, रामपुरी १, रेड्डी गोडावून १, साईनगर ५, सर्वोदय वार्ड १, स्नेहानगर १, वनश्री कॉलनी १ व येवली येथील १ जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यात २६ जण आढळून आले आहेत. त्यात अहेरी शहरातील १४, बोरी गावातील २ व मरपल्ली येथील १० जणांचा समावेश आहे. आरमोरी १० मध्ये सर्व स्थानिक आहेत. भामरागड एक जण स्थानिक आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील २ जणांचा समावेश आहे. धानोरा येथील चार जण शहरातील आहेत. एटापल्ली मधील १५ मध्ये १२ सीआरपीएफ व ३ हेडरी येथील एसआरपीएफ आहेत. कोरची तालुक्यातील ७ मध्ये स्थानिक ४, बेडगाव, बिरीहाटोला व टेकाबेडल येथील प्रत्येकी एक जण आहे. कुरखेडा तालुक्यातील आंतरगाव येथील १ व स्थानिक १ जणाचा समावेश आहे. सिरोंचा शहरातील ३ जण आहेत. देसाईगंज तालुक्यातील ६ जणांमध्ये शंकरपूर १, सीआरपीएफ २, होमगार्ड १, कस्तुरबा वार्ड १ व विसोरा येथील १ जणाचा समावेश आहे.
नागरिक अजुनही बिनधास्तच
कोरोना रूग्णांची संख्या जिल्ह्यात व गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. या गर्दीमध्ये शारीरिक अंतर पाळले जात नाही. काही नागरिक केवळ कारवाईपासून वाचण्यासाठी मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे.