CoronaVirus News : तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:46 PM2020-07-24T12:46:21+5:302020-07-24T12:50:29+5:30

कोरोना मृत्यूची नोंद तेलंगणा राज्यात होणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

CoronaVirus News: A 75-year-old woman from Telangana died due to corona in Chandrapur district | CoronaVirus News : तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू 

CoronaVirus News : तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू 

Next
ठळक मुद्देया महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते.

चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हयातील  रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचे काल रात्री उशिरा ( २४ जुलैला पहाटे २.३० वाजता ) निधन झाले. या महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला तेलंगणाची मूळनिवासी असल्यामुळे या महिलेचा मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील कोरोना बाधित म्हणून होणार नसल्याचे  जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोट मध्ये सदर महिला ही तेलंगणा राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे.

२१ जुलै रोजी दाखल केलेल्या महिलेला श्वसनासंदर्भातील समस्या होती. तसेच ही महिला उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खासगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब २२ जुलै रोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल २३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. २३ जुलैच्या रात्री १२.५०च्या सुमारास (२४ जुलैला) या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र २४ जुलैच्या पहाटे २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सदर महिला रुग्ण यांचा मूळ पत्ता तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून होणार नाही, असे स्पष्टीकरण डॉ. भास्कर सोनारकर यांनी आपल्या अधिकृत प्रेसनोट मध्ये स्पष्ट केले आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३३६ पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुदैवाने अद्याप एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक    

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

Web Title: CoronaVirus News: A 75-year-old woman from Telangana died due to corona in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.