गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा ठरतोय कोरोनावाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:58+5:302021-04-14T04:33:58+5:30

कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का? - वैद्यकीय घनकचऱ्याप्रमाणेच विषाणूजन्य कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असते. अन्यथा तो कचरा कोरोना ...

Coronavirus is the waste in the home of the patient in the home separation | गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा ठरतोय कोरोनावाहक

गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा ठरतोय कोरोनावाहक

Next

कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?

- वैद्यकीय घनकचऱ्याप्रमाणेच विषाणूजन्य कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असते. अन्यथा तो कचरा कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.

- गडचिरोली नगर परिषदेने गेल्याच महिन्यात कचरा गोळा करण्याचे कंत्राट नवीन व्यक्तीला दिला आहे. त्यामुळे कचरा गोळा करण्याबाबतचे पूर्ण नियोजन अजून होऊ शकले नाही.

- नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबत अजून जागरूकता नाही. त्यासोबतच आता कोरोनाबाधित कचराही वेगळा ठेवण्याची व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे.

- आरोग्य निरीक्षक अनिल गोवर्धन यांनी याबाबत जनजागृती आणि नियोजन करणार असल्याचे सांगितले.

कोट

- कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी सर्वांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत उद्याच नियोजन केले जाईल. त्याबाबत संबंधित कर्मचारी, कंत्राटदाराची बैठक घेऊन योग्य ती पावले उचलली जातील.

- रवींद्र भंडारवार

उपमुख्याधिकारी, नगर परिषद

१५० कचरा एकत्र करणारे कर्मचारी

५ टन ओला कचरा

७ टन सुका कचरा

गडचिरोली तालुक्यातील एकूण रुग्ण - ५६४३

बरे झालेले आतापर्यंतचे रुग्ण - ४७७२

उपचार घेत असलेले रुग्ण - ७९७

गृह विलगीकरणातील रुग्ण - ४२३

Web Title: Coronavirus is the waste in the home of the patient in the home separation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.