घरकुलाच्या अनुदानासाठी नगरसेवक खरकाटे उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:53+5:302021-08-13T04:41:53+5:30
शासन, प्रशासनास वारंवार विनंतीवजा निवेदन देऊनही समस्या मार्गी लावण्यात आल्या नसल्याने लाभार्थ्यांची स्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. ...
शासन, प्रशासनास वारंवार विनंतीवजा निवेदन देऊनही समस्या मार्गी लावण्यात आल्या नसल्याने लाभार्थ्यांची स्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. याबाबत वैयक्तीकरीत्या तीनदा निवेदन सादर करूनही दखल घेण्यात आली नसल्याने उपोषणाचा मार्ग निवडला असल्याचे खरकाटे यांनी सांगितले.
(बॉक्स)
अर्धवट बांधकामामुळे संसार उघड्यावर
नगरसेवक खरकाटे यांनी दिलेल्या निवेदनात, देसाईगंज नगर परिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११६ लाभार्थ्यांना डीपीआर-१ अन्वये व ३९३ लाभार्थ्यांना डीपीआर-२ अन्वये मंजुरी प्रदान केली होती. त्यांपैकी एकूण ५०६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता एक लाख रुपयांप्रमाणे वितरित करण्यात आला आहे. यांपैकी सर्व लाभार्थ्यांनी स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकाम पूर्ण केले असून, उर्वरित अनुदान मागील १५ महिन्यांपासून रखडले असल्याने लाभार्थ्यांना उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आहे.
120821\1623-img-20210812-wa0065.jpg
आमरण उपोषणात मी कशासाठी हे करत आहे हे सांगतांना नगरसेवक सचिन खरकाटे