छत्तीसगडमधील नक्षल कारवाया रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पत्रव्यवहार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:51 PM2021-05-21T16:51:18+5:302021-05-21T16:51:55+5:30

Home Minister Dilip Walse-patil : गृहमंत्री वळसे पाटील, महाराष्ट्रातील कामगिरीच्या आधारावर देणार टिप्स

Correspondence will be sent through the Chief Minister to stop Naxal activities in Chhattisgarh | छत्तीसगडमधील नक्षल कारवाया रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पत्रव्यवहार करणार

छत्तीसगडमधील नक्षल कारवाया रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पत्रव्यवहार करणार

Next
ठळक मुद्देनागपूर दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटील यांनी शुक्रवारी पोलीस-नक्षल्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला भेट दिली.

गडचिरोली : महाराष्ट्रात नक्षलविरोधी अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात असल्याने नक्षल चळवळ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे, पण छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायांना रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना काय करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटील यांनी शुक्रवारी पोलीस-नक्षल्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा घेऊन सरकारी पातळीवर पोलीस दलाच्या प्रलंबित असलेल्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) संजय सक्सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रलंबित कामे मार्गी लावणार
- यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला विविध कामांसाठी लागणारा निधी, बांधकामे, संपर्क साधनांची सुविधा, दक्षिण गडचिरोली भागातील मोबाइल संपर्क सेवा, आदी प्रलंबित कामे शासनस्तरावरून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
- गरीब, दुर्गम भागासाठी सरकार काही करत नाही, असा अपप्रचार करत नक्षलवादी गावकऱ्यांना त्यांच्या चळवळीत सहभागी करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडे दुर्गम भागात अनेक विकासात्मक योजना पोलिसांमार्फतच राबविल्या जात आहे. यामुळे नक्षलवाद्यांना नागरिकांचे पाठबळ मिळणे कठीण झाले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

Web Title: Correspondence will be sent through the Chief Minister to stop Naxal activities in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.