या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च झालेत तब्बल ८० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:23 PM2020-01-08T13:23:37+5:302020-01-08T13:24:01+5:30
एटापल्ली-गट्टा या ३६ कि.मी. अंतर असलेल्या डांबरी रस्त्याच्या डागडुजीवर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि त्यावरून गाडी चालवणे हे जिकिरीचे काम बनले आहे.
Next
ठळक मुद्देएटापल्ली-गट्टा मार्गावरील जीवघेणा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्ली-गट्टा या ३६ कि.मी. अंतर असलेल्या डांबरी रस्त्याच्या डागडुजीवर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि त्यावरून गाडी चालवणे हे जिकिरीचे काम बनले आहे.
दरवर्षी पावसाळ््यात हा मार्ग उखडून जातो. दरवर्षी यावर खर्च करून डागडुजी केली जाते. मात्र पुढच्या पावसाळ््यात तो पुन्हा खराब होतो. डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. निकृष्ट कामामुळे हजारो रुपये खर्च करूनही रस्ता मात्र जैसे थेच आहे.