सेतू केंद्रांनी बनविले बनावट जात प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:03 AM2018-10-27T01:03:46+5:302018-10-27T01:04:26+5:30

जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या आलापल्ली येथील तीन सेतू केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सेतू केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Counterfeit caste certificate created by Setu centers | सेतू केंद्रांनी बनविले बनावट जात प्रमाणपत्र

सेतू केंद्रांनी बनविले बनावट जात प्रमाणपत्र

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांना अटक : आलापल्लीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या आलापल्ली येथील तीन सेतू केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सेतू केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी अहेरी येथील दोन नागरिकांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केले. सदर प्रमाणपत्रावर खोडखाड केले असल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाºयांच्या लक्षात आले. यावरून कोळसेपल्लीचे तलाठी विनोद कावटी यांनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता, सदर प्रमाणपत्र प्राणहिता इंपोटेक सर्व्हिस आलापल्ली या सेतू केंद्रात तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
यावरून सेतू केंद्र चालक दिवाकर आनंद मडावी, सचिन चिंतामनी डोंगरे, दीक्षा सखाराम झाडे या तिघांविरोधात भादंवि कलम ४२०, ४६६, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हजारे करीत आहेत.

Web Title: Counterfeit caste certificate created by Setu centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.