जिल्ह्यातील नागरिक पिताहेत आराेग्यास घातक बनावट दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:00 AM2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:35+5:30

जिल्ह्यात अधिकृतपणे दारू मिळत नसली तरी भंगाराच्या दुकानात किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये दररोज दारूच्या बाटल्यांचा मोठा खच जमा झालेला असतो. त्यातील बाटल्यांच्या संख्येवरून जिल्ह्यात कोणता ब्रॅँड सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सहज अंदाज येतो. कमी किमतीच्या व्हिस्की विक्रीचे प्रमाण जास्त आहे.

Counterfeit liquor dangerous to the health of citizens in the district | जिल्ह्यातील नागरिक पिताहेत आराेग्यास घातक बनावट दारू

जिल्ह्यातील नागरिक पिताहेत आराेग्यास घातक बनावट दारू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या ती ३ दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारू बंदीनंतरही जिल्ह्यात पिणारे आणि पाजणारे (पुरवठादार) लोकसंख्येनुसार वाढतच आहेत. चोरून-लपून पुरविल्या जात असलेल्या दारू मध्ये बनावट दारूचे प्रमाण बरेच वाढले आहे. हलक्या दारूत आणखी केमिकल्स मिसळून ते विविध विदेशी कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरून त्याची विक्री केली जात असल्यामुळे ही दारू आरोग्यासाठी अपायकारक ठरत  आहे. 
जिल्ह्यात अधिकृतपणे दारू मिळत नसली तरी भंगाराच्या दुकानात किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये दररोज दारूच्या बाटल्यांचा मोठा खच जमा झालेला असतो. त्यातील बाटल्यांच्या संख्येवरून जिल्ह्यात कोणता ब्रॅँड सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सहज अंदाज येतो. कमी किमतीच्या व्हिस्की विक्रीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे छत्तीसगड, मध्यप्रदेशातील हलक्या दर्जाच्या दारूपासून तयार केलेल्या लोकप्रिय ब्रँडच्या बनावट दारूची विक्री सर्रासपणे केली जाते. ही बनावट दारू अधिक घातक ठरत असल्यामुळे त्याला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 
विशेष म्हणजे ज्यांना या बनावट दारूची कल्पना आहे ते लोक आता अधिकचे पैसे देऊन बनावट दारू घेण्याऐवजी अधिकचे पेट्रोल खर्च करून लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत जाऊन आपला शौक पूर्ण करीत आहेत.

काय आहेत बनावट दारूचे परिणाम ?  
- कमी खर्चात अधिक झिंग यावी, यासाठी अशुध्द दारूमध्ये अधिक रासायनिक पदार्थ मिसळून ते लाेकप्रिय ब्रॅन्डची दारू म्हणून विकली जाते. हे करताना बाटली  व्यवस्थित सील केल्याने त्यात बाहेरून दारू भरल्याचे ओळखू येत नाही. ही दारू घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी डाेकं दुखण्याचा त्रास हाेताे. वारंवार घेतल्याने लिव्हर खराब हाेते.

युवा पिढीत वाढले दारूचे आकर्षण
जिल्ह्यातील युवा पिढीतही आता मोठ्या शहरातील युवा वर्गाप्रमाणे ‘सेलिब्रेशन’चे फॅड वाढले आहे. लहानपणापासून दारूबंदी पाहात असल्याने या युवा पिढीला सर्वाधिक आकर्षण त्याचेच आहे. त्यामुळे मित्राने दारूची पार्टी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यातून अनेकांना दारूचे व्यसन जडून त्यांच्या जीवनाची दशा होत आहे. इतर वस्तूंप्रमाणे दारू सहज मिळणारी वस्तू असती तर युवा पिढीसह कोणालाच त्याचे आकर्षण वाटले नसते, अशी भावना एका सुशिक्षित युवकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

Web Title: Counterfeit liquor dangerous to the health of citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.