कोतवाल पदभरती प्रक्रियेत घोळ
By admin | Published: June 14, 2014 02:15 AM2014-06-14T02:15:47+5:302014-06-14T02:15:47+5:30
कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील एका कोतवाल पदासाठी ११ जूनला लेखी परीक्षा घेण्यात आली.
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील एका कोतवाल पदासाठी ११ जूनला लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेपूर्वीच या परीक्षेचा पेपर फोडण्यात आले
असून त्याची नक्कल पानठेल्यानजिक मिळाली. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणनिहाय उमेदवारांची यादी लावण्यात आली नाही. सरसकट जितेंद्र अंबादे या एकाच उमेदवारांची
निवड करून यादी लावण्यात आली. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोळ झाला आहे, असा आरोप येंगलखेडा येथील अन्यायग्रस्त उमेदवारांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या भरती प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाण झाली असून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप उपस्थित उमेदवारांनी केला. सदर भरती प्रक्रिया रद्द करून
नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे उमेदारांनी केली आहे. पत्रकार परिषदेला श्रीराम वट्टी, संजय आष्टेकर, सुशील भन्नारे, अजय भन्नारे, नितेश
बावनथडे, प्रकाश नंदेश्वर, कविता कोसरे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)